# श्री राम आरती – बोल

> श्री राम आरती: भगवान राम यांना समर्पित, “त्रिभुवनमंडितमाळ गळां” ने सुरुवात. संपूर्ण पाठ तुमच्या भाषेत वाचा.

Source: https://www.hinducalendar.today/mr/marathi/lyrics/aarti/gods/shri-rama/shri-rama-aarti

115%

[शेअर करा](https://wa.me/?text=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%0A%0Ahttps%3A%2F%2Fwww.hinducalendar.today%2Fmr%2Fmarathi%2Flyrics%2Faarti%2Fgods%2Fshri-rama%2Fshri-rama-aarti)

ॐ

१

त्रिभुवनमंडितमाळ गळां।

आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा॥

२

श्रीराम जय राम जय जय राम।

आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

३

ठकाराचे ठाण वारीं धनुष्यबाण।

मारुती सन्मुख उभा कर जोडून॥

४

श्रीराम जय राम जय जय राम।

आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

५

भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती।

स्वर्गाहून देव पुष्पवृष्टि करिती॥

६

श्रीराम जय राम जय जय राम।

आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

७

रत्नजडित हार वर्णू काय मुकुटी।

आरती ओवाळूं चौदां भुवनांच्या कोटी॥

८

श्रीराम जय राम जय जय राम।

आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥

९

विष्णुदास नामा म्हणे मागतो तूतें।

आरती ओंवाळूं पाहूं सीतापतीतें॥

१०

श्रीराम जय राम जय जय राम।

आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥
